h

 

 

 

 

 

       । ।   धार्मिक      वास्तुशास्त्र      ज्योतिष्यशास्त्र      करिअर      सामाजिक     

ज्योतिष्य शास्त्र ... मुख्य पृष्ठ

  kundali 

           ॥ श्री गणेशाय नमः ॥

विचारा तर डॉट कॉम ज्योतिष्यशास्त्र काय सांगते?

प्रश्नांची सूची

विचारा

 

आजचे पंचांग :

 

          ।। ॐ गं गणपतये नमः ।। 

 

ज्योतिषशात्र म्हणजे काय ?

  ज्योति:शास्त्र म्हणजे कालाचे विधान सांगणारे शास्त्र.

 

   ज्योतिष हा शब्द ज्योति: ह्या संस्कृत शब्दा पासुन आलेला आहे. ज्योति: या शब्दाचा अर्थ तेज किंवा प्रकाश कारक अवयव असा होतो.( मराठीत या वरुनच ज्योत हा शब्द आलेला आहे.)

   आता हे प्रकाशकारक अवयव कोणते ? आवकाशात असलेले तेजाचे चंद्र सुर्य रुपी गोळे.

     जोति: प्रमाणे तेजस्वी ग्रहांच्या आभ्यासाचा विषय म्हणून ज्योति: + ष ( विषया तील ष ) = ज्योतिष अशा प्रकारे हा शब्द तयार झाला असावा. शास्त्र हा शब्द अनुशासन, शिकवणे व नियम या अर्थाने वापरला जातो. म्हणजे ज्योतिषा संबंधी जे शिक्षण किंवा नियम ते ज्योति:शास्त्र .

 

ज्योति:शास्त्राचे महत्त्व काय ?

 

     वेदा मध्ये शिक्षा कल्प ( सूत्र ), व्याकरण, निरुक्त, छंद  आणि ज्योतिष अशी सहा अंगे सांगीतलेली आहेत. म्हणून वेदाला षडंगवेद असे म्हणतात. ( चरणव्यूह खंड २ =  ॥ शिक्षा कल्पो व्याकरणं नैरुक्तं छंदो ज्योतिषमिति षडंगानि भवन्ति ॥ ) इतर शास्त्रां पेक्षा ज्योति:शास्त्राचे महत्त्व मोठे आहे. ऋगवेदात ज्योतिषाच्या सातव्या खंडात (शेवट्च्या खंडात ) या संबंधात महत्त्व अधोरेखित करणारा श्लोक पुढे देत आहे.

 

यथा शिखा मयुराणां नागानां मणयो यथा ।

तद्वद्वेदांगशास्त्राणां ज्योतिषं मूर्धनि स्थितम् ॥

 

   (अर्थ : मोराची शिखा (तुरा) शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवा वर (डोक्यावर ) जसा शोभतो सर्प मणी जसा नागाच्या फण्या मध्ये शोभतो तसा वेदांच्या सहाही अंगांमध्ये (शास्त्रां मध्ये) शिरोभागी ज्योति:शास्त्र शोभते.

  

  या वरुन ज्योति:शास्त्राचे महत्त्व प्राचीन कालापासून मानले आहे हे स्पष्ट होते.

    विचारा तर डॉट कॉम वर आपण ह्या शास्त्रा संदर्भातील प्रश्नांची प्रश्न-उत्तरे स्वरुपातील लेख वाचणार आहात.

  

  तसेच आपली जन्म पत्रिका त्यावरील उपाय योजना व ग्रहपिडा निवारण उपाय, राशीभविष्य, रोजचे पंचांग, शुभाशुभ दिवस, प्रत्येक महिन्याचे शुभ मुहूर्त इ.माहिती आणि थेट मार्गदर्श अशाप्रकारच्या अनेक गोष्टी मराठी मध्ये आपल्या साठी घेउन आलेलो आहोत. 

?

 

नवग्रहांची माहिती सांगाल  का ?

 

आपल्या पृथ्वीचा निर्माता व रक्षणकर्ता सूर्य या भोवती बुध,शुक्र, पृथ्वी, चंद्र मंगळ, लघुग्रह, गुरू, शनी, युरेनस, नेपच्युन या ग्रहांचे प्रिभ्रमण होते तसेच पृथ्वी सुर्य चंद्र एका सरळ रेषेत ज्याठीकाणी येतात त्या ठीकाणई जे दोन बिंदू तयार होतात त्याठीकाणी राहू व केतु कल्पीलेली आहेत. या राहू केतुंना स्वतःचा असा स्वभाव नाही मात्र त्यांचे जे चूबकीय तत्त्व आहे त्याचा मानवावर खूप प्रभाव पडतो. पृथ्वीच्या भोवती सुअर्य फीरत नसला तरी पृथ्वी ही मध्य वर्ती कल्पून आपल्या वर त्यात्या ग्रहांचा काय प्रभाव पडतो याचा समग्र अभ्यास ऋषी मुनींनी केला वत्याचे वर्नन ग्रंथात करुन ठेवले. प्रत्येक ग्रहाच्या कारक तत्त्वांची त्यांनी चिकीस्ताकेली व त्याचा मानवा वर काय प्रभाव पडतो याचे विष्लेशण केले. या सर्वांचे विस्ताराने वेळोवेळी ग्रंथां मध्ये वर्णन केले आहे

 

 पुढे वाचा..

पूढील विषयांचे प्रश्न विचारा तर ..

ज्योतिष्य शास्त्र
- शुभ कार्यांचे मुहूर्त
- आजचे राशी भविष्य

- अडचणींवर दैवी उपाय

-प्रींटेबल मोफत जन्म पत्रिका

जानेवारी २०१२ या महीन्याचे

        ॥ राशी भविष्य  ॥

  हा महीन्यांच्या राशिभविष्याचा नवा कॉलम... यात तुमचं महीन्यांच भविष्य सांगितलं जाणार आहे.... पुढे वाचा.

राहू काळ Rahu Kaal

 

   सर्वसाधारण पणे प्रत्येक दिवसाला वारा नुसार ठरावीक वेळ ही अशुभ मानली जाते राहू काळ हा अशुभ वेळेचं दर्शक आहे. मोठ्या कामांची सुरुवात या वेळेत करु नये.

   राहू अशूभ काळामधे शक्यतो महत्त्वाच्या कागदपत्रांवर सह्या, मोठ्या प्रवासाची सुरूवात, महत्वाची कामे,अति महत्त्वाच्या भेटीगाठी टाळाव्यात.

दिवस   वेळ    
सोमवार सकाळी ०७.३० ते ०९.०० 
मंगळ्वार दुपारी १५.०० ते १६.३० 
बुधवार दुपारी १२.००  ते १३.३०
गुरुवार दुपारी १३.३० ते १५.००
शुक्रवार सकाळी १०.३० ते १२.००
शनिवार सकाळी ०९.०० ते १०.३०
रविवार संध्या १६.३० ते १८.००

  तुमची रास कशी ओळखाल?

 

   जन्मकुंडलीत तीन राशी महत्त्वाच्या मानल्या जातात.

 पहिली तुमची लग्न रास. तुम्ही जेव्हा जन्माला आलात त्या वेळी आकाशात पूर्व क्षितिजावर जी रास.... पुढे वाचा.

विचारा तर !